आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण
कधीच एकसारखा नसतो
कधी सरळ वाटा जीवनात
तर कधी वळण येतच असतो
प्रेरणा देणाऱ्या शब्दांना
निस्वार्थपणे स्विकारता यायला हवं
अपमानाचे शब्द देखील
स्वीकारायचं बळ स्वःमध्ये असायला हवं
सुख मिळाले म्हणूनी
त्याला गर्वाने मिरवायचे नसते
कधीकाळी आलेल्या दुःखाने
स्वतःला खचू द्यायचे नसते
जीवन म्हटल्यावर
संघर्ष राहणारच
कधी सुख तर कधी दुःख
जीवनात येत जात राहणारच
पुनम सुलाने, हैदराबाद