सुख मराठी कविता Marathi Kavita, Poem

प्रिती सुरज भालेराव लिखित मराठी कविता "सुख"

सुख मराठी कविता Marathi Kavita, Poem

माणसांनी भरलेल्या जगात
आपलं असं कुणी भेटेल का?
स्वतःची चूक नसतांना मग
खरचं कोण मान्य करेल का?

दरवेळी आपण आपलच
घोडं पुढे दामटत असतो,
कुणाच्या वाट्याला जाण्यात
काहीच अर्थ नसतो

सगळ्या जगाचा विचार
आपणच का करावा?
किती काळ सुखासाठी
धीर आपणच धरावा

थोडेसे पैसे देऊन कधी
सुख मिळत असतं का?
काहीही झालं ना कधी
दुःख पाठ सोडतं का?

सुखाची अपेक्षा करणं
हा गुन्हा आहे का?
नकळत मन दुखवणं
हीच शिक्षा आहे का?

रोजच असा किती दिवस
दुःखाचा डोंगर सर करायचा
सुखाची अपेक्षा करत मग
आयुष्याचा प्रवास थांबायचा

आयुष्याच्या वळणावर
माणसं अनेक भेटली
सुख देण्याऐवजी त्यांनी
संकटच मोठी दिली

वेडं असतं मन आपलं
सुखाचा शोध घेत बसतं,
जीवनप्रवास संपतो पण
सुख कधी मिळत नसतं

preeti bhalerao bol marathi

सौ. प्रिती भालेराव, पुणे