हरी पांडुरंग हरी पांडुरंग

पांडूरंगाची वारी कशी असावी, याचे चित्रण करणारी कविता चौधरी यांची रचना

हरी पांडुरंग हरी पांडुरंग

उभा विटेवरी विठू सावळा, 
भोवती भक्तांचा मेळा
पाहून ते सुंदर रुप,
तहान भूक विसरती वारकरी
हरी पांडुरंग हरी पांडुरंग

टाळ, चिपळ्या तुळशी वृंदावन माथी
मुखी ज्ञानोबा तुकोबांचे अभंग
हरीनामाचा होई गजर
हरी पांडुरंग हरी पांडुरंग

पोशिंदा या जगाचा
विठू कैवारी आमुचा
ओढ तुझी लागे विठ्ठला
हरी पांडुरंग हरी पांडुरंग

सावळी मूर्ती विठ्ठलाची
माऊली जगाची
एक वार कृपा करी, 
हाक ऐक लेकरांची
हरी पांडुरंग हरी पांडुरंग

मुखी राहू दे तुझे नाम
नको ठेवू तुझ्यापासून दूर
वसो माझ्या मनी नित्य तुझी मूर्ती
हरी पांडुरंग हरी पांडुरंग...

kavita chaudhari

सौ. कविता चौधरी, भुसावळ