हौस पुरवा राया लाख मोलाची (लावणी)

सौ. सुनीता परदेशी उदय लिखित एक लावणी हौस पुरवा राया लाख मोलाची...

हौस पुरवा राया लाख मोलाची (लावणी)

नववार साडीला
काठ सोन्याची,
हौस पुरवा राया
लाख मोलाची .

चापून चूपून
नेसल साडी,
लडवाळ नखरा
दावीन लाडी लाडी.

नवलखी हार
बाजु बंद दोन
माग टिका द्यावा
कुंकू भरुन.

सोन्याचे गजरे
खणखण चूड्याची,
घाला ना रावजी
अंगठी हिऱ्याची.

नाकात नथ
रत्नजडीत मोती,
पायी पैजण
खुणवू किती.

कानात झुब
रखवाल बाई,
कपाळी चंद्रकोर
तीला तोड नाई

भर आला ज्वानीला
सरकार बघा,
हसरा मुखडा
घरी या लघबघा.

वाड्यावर मी हो
वाट पाही तुमची,
या ना दिलबरा
वेळ हाय संध्याकाळची.

या ना दिलबरा
वेळ हाय संध्याकाळची...

सौ. सुनीता परदेशी उदय.
तिरुअनंतपुरम, केरळ.