हे पांडूरंगा,
कोरोना आला
अन् विना परिक्षेचे
मुलं पास झालेत
ते ही अभ्यास न करता
म्हणून म्हणतोय रे पांडूरंगा
असा एखादा आजार
माणसाच्या मनावरही येऊ दे
खरं प्रेम करणाऱ्यांना
त्याचं प्रेम मिळू दे
अन् नशीबाच्या परिक्षेत
नेहमीच नापास होणाऱ्यांनाही
एकदा तरी पास होऊ दे.
फार अवस्था वाईट झालीये रे देवा
थोडं खाली तू डोकून तर बघ
काय चाललंय पृथ्वीवर जरा
थोडं तू समजून तर बघ.
सत्याने चालणाऱ्यांच्या गळ्यावर
नेहमीच इथे कुऱ्हाडीचे घाव आहे
वाईट कृत्य करणाऱ्यांच्या गळ्यात मात्र
नेहमीच फुलांचे हार आहे
वागावं तरी कसं आता
याचा अजिबात मेळ नाही
प्रत्येकाच्या नशीबात इथे
प्रेमाची भेळ नाही.
बाबा चन्ने, धोंदलगाव