आज कुणाचे तोंड रंगले
आज कुणाचे गाल
होळीचा रंग खेळण्यात
रमले बाल गोपाल
रंगी बेरगी चेहरे दिसती
रंगी बेरंगी पोशाख
सर्कशी मधील विदूषकाची
जणू भासे ही शाख
आज सर्वच गाती -नाचती
धुंद असती मनी
होळीच्या या धुंदीत रमुनी
रंग उधळती जनी
होळीच्या या रंगात रंगुनी
विसरून जाती भान
होळीचे हे विविध रंग
मात्र आम्ही एक समान
होळीच्या या विविध रंगात
रमती सारे बहन-भाई
हिंदू ,मुस्लिम शीख इसाई
एकच भूमी,एकच आई
धोंडीरामसिंह ध. राजपूत,
मा. शिक्षणाधिकारी
वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर