दुर्गुणांची होळी

संजय बिडगर लिखित मराठी कविता दुर्गुणांची होळी

दुर्गुणांची होळी

रंग निसर्गाचे सारे
जर भिनले  अंतरी,
होळी होई दूर्गुणांची 
जाणा मर्म आतातरी.

पाणी नासाडी करून 
काय तुम्ही मिळवता,
दुष्काळात पाण्याविना 
किती त्रासली जनता.

आहे भाकड पुराण  
झाले कालबाह्य सारे
तुम्ही तरीही अजुनी
ठोठावता तीच दारे.

मानवता रंग खरा
रंगूनिया त्यात सारे,
निसर्गाला जपूनिया
बाकी आवरा पसारे.

साता रंगांचे मिश्रण 
मनामध्ये मिसळावे   
दोष नाहीच रंगांचा
तथ्य एवढे जाणावे.

जाळा दारिद्र्य आळस
आता होळीच्या अग्नीत 
होळी होता दुर्गुणांची 
येई जीवन लयीत

Sanjay Bidgar

संजय बिडगर,
पोलिस उपनिरीक्षक 
नाशिक शहर