आस जगण्याची

सौ. शितल बाविस्कर लिखित मराठी कविता आस जगण्याची

आस जगण्याची

विसरलास उपकार मायबापाचे
चांगले पांग फेडलेस वात्सल्याचे ||१||

अमाप कष्ट उपसून केले संगोपन
तरी नाही गुंतले का रे तुझे मन? ||२||

पाश तोडले सारे एका क्षणात
आम्ही आहोत तुझ्याच हृदयात ||३||

आमची जबाबदारी नाकारलीस
स्वप्न सारी बेचिराख रे केलीस ||४||

वृद्धाश्रमात आम्हां आणून सोडले
कोणता गुन्हा घडला? नाते तोडले ||५||

आमच्या जगण्याची तूच होतास आस
तुझेचं होताहेत आम्हांला नित्य भास ||६||

बाळा, आमची काही हरकत नाही
तुझ्या सुखातच आमचे सुख राही ||७||

             Shital Baviskar                       

सौ. शितल बाविस्कर -राणेराजपूत, 
जळगाव