जीव कसा गुंतला मराठी कविता Marathi Kavita, Poem

सोनाली रामलाल रसाळ लिखित मराठी कविता जीव कसा गुंतला

जीव कसा गुंतला मराठी कविता Marathi Kavita, Poem

गुदमरतो श्वास माझा
वणवा शब्दांनी पेटला
भावनेचा अपमान मी
क्रूरतेने हा सोसला

धगधगत्या आठवणींचे
बंद ओथंबून वाहते
आसवांनी भिजते रात
अन् डोळे ही लाचार ते

मुके माझे शब्द आणि
मुक्या माझ्या यातना
घेऊनी आधार कवितेचा
मनास देते मी संत्वना

माझ्या हृदयात दुःखाचा
पूर दुथडी भरून वाहिला
ना किनारा भेटला अन्
ना जीव कुठे विसावला

नाही बंध माझे कुठे
नाही धागा मोहाचा
तरी ही जीव कसा गुंतला
विचार हा माझा रोजचा

सोनाली रामलाल रसाळ, 
कापूसवाडगाव, ता. वैजापूर