मी एक शिक्षिका बाई

सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता मी एक शिक्षिका बाई

मी एक शिक्षिका बाई

मी आहे एक शिक्षिका बाई
शाळेत जायची मला सदा घाई
उठता बसता शाळा मनी येई
शाळेविना  मुळी करमत नाही...1

नवीन उपक्रम राबविले ग सई
उपक्रमाने नाविन्य अध्यापनात येई
अध्यायानार्थी उत्साही च राही
सक्रिय राहण्याचा वसा मी घेई....2

सावित्रीची लेक आहे ग मी बाई
याचे भान मला सदैव च राही
कुकर्म  माझ्याकडून घडू नये काही
प्रार्थना मनी सदैव करीत राही..3

पाहता मुलांचे हसरे चेहरे ग माई
दुःख सारे क्षणात नाहीसे च होई
अनेकांना अस्तित्व माझे सहन न होई
 बालकांची आहे आवडती बाई...4

Jayshree Munde

सौ. जयश्री अर्जुन मुंडे
अंबाजोगाई