आई समोर मांडला मी प्रस्ताव

कु. प्रणोती राम शेंडे लिखित मराठी कविता आई समोर मांडला मी प्रस्ताव

आई समोर मांडला मी प्रस्ताव

मला तुझ्याच उदरी येण्याचा
देशील का आई होकार
आहे मला विश्वास देणार
नाही माझ्या प्रस्तावाला तू नकार

देशील का मला एक 
करूनी आई तू विश्वास
घेऊ देशील का प्रत्येक
जन्मात तुझ्या उदरी श्वास

खेळायचे आहे प्रत्येक 
जन्मात तुझ्याशी खेळ 
जोडशील का पुन्हा तुझ्या
उदरी येण्याचा आई मळे

माय लेकीच्या नात्याची असे
किती सुंदर ती  प्रीत 
प्रत्येक जन्मी तुझ्या उदरी 
येण्याची राहो बनुणी रीत

जेव्हा मी आईला हा
प्रस्ताव मांडला 
तेव्हा माझ्या हृदयात 
जणू चंद्राच सांडला

Pranoti Ram Shende
    कु. प्रणोती राम शेंडे,
पिंपळगाव, जि. यवतमाळ