आई प्रेमाची मूर्ती...

सौ . ज्योती संजय शिंदे लिखित मराठी कविता आई प्रेमाची मूर्ती...

आई प्रेमाची मूर्ती...

प्रेमाची मूर्ती हृदयात जागा
जगण्यात उर्मी मोलाची कीर्ती.  

आई ईश्वर जगी आधार
जन्म उधार दान पदरी जन्म देऊन 

आई चंदन आई वंदन
दारी गोकुळ शोभे नंदन

हात मायेचा घास प्रेमाचा
शब्द सुखाचा झरा मायेचा

नऊ महिने कळ सोसून
जन्म देऊन झाली महान

आई शिदोरी दान पदरी
माय सावरी झाली बावरी

आई वात्सल्य आहे निर्झर
आई प्रेमाचा गोड संगम

Jyoti-sanjay-shinde
सौ . ज्योती संजय शिंदे
रा.चाकुर.जि.लातूर