माझा भारत माझी शान
सुख समृद्ध भारतात मिळे
सोन पिवळे पीक मातीतून
श्रावणात सृष्टी सौंदर्य खिळे
ऋण फेडू भारत मातेचे
झाडे लावू संगोपन करु
निसर्गाचे वरदान आम्हांस
निसर्ग संवर्धनाची कास धरु
ऋण फेडू भारत मातेचे
भ्रष्टाचार मुक्त भारत देश
सोडूनी लाचारीचे जीवन
वाढे आत्मविश्वासाची वेश
भारत थोर संतांची भूमी
पंडित आयुर्वेदाचार्य महान
गातो क्रांतिवीरांच्या गाथा
सुख संपन्नेत आहे शान
जपू संस्कृती भारताची
घेऊ व्रत रक्षणार्थ संस्कारी
करी सण साजरे नवी पिढी
जाणून महत्व अंगीकारी
सौ. रोहिणी अमोल पराडकर
कोल्हापूर