खरंच आत्महत्या शेवटचा पर्याय आहे का?

सौ. जया वि. घुगे-मुंडे लिखित मराठी कविता खरंच आत्महत्या शेवटचा पर्याय आहे का?

खरंच आत्महत्या शेवटचा पर्याय आहे का?

जीवनाचे गीत किती
वेदनांनी भरलेले,
फुंकर हळूच मारता
विव्हळणे थांबलेले...

मनी निराशा, खिन्नता
उदासिनता भरलेली,
आपुलेच होतात वैरी
श्वासही कोंडलेली...

कुणा सांगावे सल मनीचे
गुपीत कुठे हे ऊकलावे,
काळजातल्या घावांना
सांगा कसे सोसवावे...

आयुष्याचे कोडे अजूनी
कधी कुणास नाही कळले,
उदास मन होई तेव्हा
कोणी आसवं पुसले...

किती जगाचे वण घावांचे
ह्रदयी असती उमटलेले,
मनोमनी दररोज जपता
काळीज चिरत गेलेले...

निर्भीड करावे मनच आपुले
सावरूनी हे प्राक्तान आपुले,
नशिबाने केली जरी थट्टा
विचार मनी सात्त्विक भले...

एकवेळचा मांडलेला डाव
ऊधळूनी का बरं द्यायचा,
पुन्हा नाही येणे कधीच
श्वास आपुला जपायचा...

जगास मारूनी लाथ एकदा
हिंमतीने स्वत: सावरायचेच,
किती येऊ द्यात वादळं, लाटा
आपण सद्बुध्दीने वागायचेच...

हा जीव असे अंश ईश्वराचा
आत्म्याच्या वरदहस्ताचा भाग,
शेवटचा पर्याय नसे आत्महत्या
मन म्हणते हे जगास सांग...

Jaya-ghuge-munde

सौ. जया वि. घुगे-मुंडे,
परळी वैजनाथ, जि. बीड