माझ्या जीवनात
नकळत प्रवास तुझा
सुकवून मला गेला
सहवास तुझा...
प्रेरणा दिलीस गं तू
काहीतरी करण्याची,
शब्दांना, भावनांना
कागदावर उतरवण्याची
माहीत नव्हते गं मला
कागदावर कसे प्रकट व्हावे
तुझ्या सहकार्याने
ते शक्य झाले...
निमित्त बनवून मला
कवयित्री तू गं बनविले
आभार तुझे व्यक्त करू कसे?
जिथे माझी गरज असेल
उभी राहील मी तिथे?
वयाची अट नाही
आपल्या विचारांमध्ये
चल नविन विश्व उभारू
आपल्या दोघींमध्ये
कावेरी अन् मनीषा
दोघींचा मेळ झाला बसमध्ये
अन् आयुष्याची प्रेमळ वाट
सुरू झाली ह्रदयामध्ये
निमित्ताने तुझ्या गं...
प्रेमळ भाऊ मला मिळाला
'पाठीराख्याचे' काय वर्णन करू
शब्द नाही माझ्या ओठी
सौ. मनीषा संदिप बैनाडे-महेर,
परसोडा, ता. वैजापूर