लेखणी मराठी कविता - Marathi Kavita

सोनुताई रसाळ लिखित लेखणीच्या सामर्थयाचे वर्णन करणारी कविता लेखणी...

लेखणी मराठी कविता - Marathi Kavita

नाव माझे लेखणी, नसेल जरी देखणी
काम माझे असते, एकदम रोखीनी
कमाल माझी एकच घडते
जेव्हा माझे तोंड उघडते

संसार मी कधीच थाटत नाही
रिकामी कधीच वाटत नाही
जो वागेल कर्तुत्वाने त्यांची
मान कधीच झुकवत नाही

युग असो कोणतेही तरी
भीतीने माघार घेत नाही
सत्य येवढे घोटून लिहिते की,
ते कधीच मिटत नाही

कथा लिहिल्या, ग्रंथ लिहिले,
लिहिल्या कित्येक कादंबऱ्या,
पोथी पुराण लिहिले तरी
मी कधीच थकत नाही

हाथ ज्यांनी धरला माझा 
मी त्यांना कधीच सोडत नाही
वेळ आली आणीबाणीची
तरीही कधीच मी मोडत नाही

सुख लिहा, दुःख लिहा,
किंवा लिहा जीवन चरित्र
काम माझे दीर्घ पाहूनी 
ख्याती माझी सर्वत्र

धर एकदा पुन्हा माझा हाथ
देईल मी साथ आयुष्याची...

 

सोनुताई रसाळ, वैजापूर