नको सागराची माया
नको आभाळ शिवाया,
फक्त जाऊ दे ग मला
थोडी शाळा शिकाया।।
थोडं शिकीन लिहाया
थोडं शिकीन वाचाया,
शिक्षणानं मी ग आई
थोडं शिकीन जगाया।।
गणित शिकीन सोडाया
इंलिश बोलाया, लिव्हाया,
वादळ ग मोठी मोठी
मी शिकीन पेलाया,
भाऊसंग मी जाईन
त्याच्या सोबत राहीन,
नको घाबरु तू आई
घरी काम बी करिन।।
दोन राहीन घरात
शोभा वाढवील अंगणात
जन्म लेकीचा घेतला
म्हणून नको मारू उदरात।।
श्रीमती जयश्री उत्तरेश्वर औताडे,
जि. प. केंद्र कन्या प्रा. शाळा, गंगाखेड, जि. परभणी