नव्या वर्षाचे करूया स्वागत...

श्रीमती जयश्री उत्तरेश्वर औताडे लिखित मराठी कविता नव्या वर्षाचे करूया स्वागत...

नव्या वर्षाचे करूया स्वागत...

काळालाही विसर पडावा,
 हरले कोण जिंकले काय?
 वाटेनेही कधीं न स्मरावे 
 पडले कोण अन सोसले काय?

उगाच वाटून मनात आणून 
 कोणाशी आपण भांडलो काय?
मने दुखवूनी,नाते तोडून
 उगीच एकट्याने रडलो काय?

हिशोब नको आता साऱ्यांचा 
 सोडून देऊ तुझे काय अन् माझे काय?
शेवटी जगणे सोपे व्हावे
 कधी जोडून हात तर कधी पाय...

नव्या वर्षाचे करूया स्वागत
 ठरवले होते आणि करायचे काय?
 देऊन एकमेकांना साथ 
बनू कधी दूध तर कधी साय...

श्रीमती जयश्री उत्तरेश्वर औताडे,
 जि. प. केंद्रीय कन्या प्रा. शाळा गंगाखेड, जि.परभणी