आयुष्य मराठी कविता - Marathi kavita

सौ. प्रिती सुरज भालेराव लिखित आयुष्याबद्दल चे वर्णन करणारी कविता आयुष्य...

आयुष्य मराठी कविता - Marathi kavita

मनातलं दुःख लपवायला
खरचं खूप हिंमत लागते
कधीकधी मनातलं वादळ
अलगद् रोखून धरावे लागते

कितीही प्रश्न पडले आयुष्यात
उत्तर कोणाकडे मागायचे
समोर आलेल्या परिस्थितीशी
नेहमीच दोन हात करायचे

मन कितीही नाराज असले
जगाला हसूनच दाखवायचे
आपल्या वाट्याला आलेले भोग
निमूटपणे आपण भोगायचे

खूप संघर्ष करत राहणं
यालाच आयुष्य म्हणतात
माझ्याच वाट्याला हे का?
असे नको ते प्रश्न पडतात

आयुष्याच्या खडतर वाटेवर
अनेक माणसे भेटतात
बोटांवर मोजण्याइतकेच
आपले होऊनी जातात

जगात वाईट माणसांप्रमाणेच
चांगली माणसं सुद्धा असतात
फक्त शोध घ्यावा लागतो त्यांचा
जवळच्या माणसांमध्येच ते दिसतात

सौ. प्रिती सुरज भालेराव, पुणे