चिमुकल्या मनाला
माझं मीच सावरलं
चिमुकल्या अश्रूंना
माझं मीच आवरलं
चिमुकल्या हृदयाला
माझं मीच मनवल
चिमुकल्या भावनांना
माझं मीच रडवल
चिमुकल्या निरपेक्ष क्षणाला
माझं मीच गोंजारल
वात्सल्य रुपी मायेला
माझं मीच ओंजारल
चिमुकल्या द्वेषाला
माझं मीच स्वीकारलं
चिमुकल्या रागाला
माझं मीच धिक्कारल
चिमुकल्या आशेला
माझं मीच उगवलं
चिमुकल्या निरशेला
माझं मीच तुडवल
चिमुकल्या आळसाला
माझं मीच सोडलं
चिमुकल्या चुकांना
माझं मीच खोडल
चिमुकल्या हाताना
माझं मीच राबवलं
चिमुकल्या ध्येय्याना
माझं मीच ठरवलं
जिद्द चिकाटीची कास
माझ मीच धरलं
यशाशिवाय आयुष्यात
काहीच नाही उरल
निष्क्रियता संशय
माझं मीच पुरल
माया दया क्षमा
माझं मीच अंगीकारल
चिमुकल्या स्वप्नांना
माझं मीच पाहिलं
स्वप्नांना सत्यात कष्टाने
माझं मीच आणील
चिमुकल्या पाठीला
माझं मीच थोपटल
चिमुकल्या दुर्गुनाना
माझं मीच धोपटल
सौ. जयश्री अर्जुन मुंडे
अंबाजोगाई