जगताना जीवन मराठी कविता Life marathi kavita

सौ. पूनम सुलाने लिखित मराठी कविता 'जगताना जीवन' यामध्ये जीवन कस जगावं जगावे याचा उलेख केला आहे

जगताना जीवन मराठी कविता Life marathi kavita

जगताना जीवन,,
नको हेवा कुणाला कुणाचा
निर्झर वाहणारा तो झरा
कधी करतो का हेवा सागराचा

होऊनी गुलाब
उमलता आले नाही
म्हणुनी,, वेलीवरच्या फुलाने
कधी उमलणे सोडले नाही

पौर्णिमेच्या रात्रीचा 
असेल चंद्र एक लाखात 
 न करता हेवा त्याचा
स्थिर ते तारे आकाशात

होऊनी सूर्य
चमकता आले नाही
म्हणुनी ,,दिव्याने कधी
प्रकाशने सोडले नाही

Poonam Sulane

पुनम सुलाने
हैदराबाद