महाराणा प्रतापसिंह Marathi Kavita

सौ. मनीषा संदिप महेर लिखित मराठी कविता महाराणा प्रतापसिंह

महाराणा प्रतापसिंह Marathi Kavita

देशप्रेम, त्याग,
बलिदानाचे प्रतिक
हिदुस्थानचे हिंदुसूर्य 
महाराणा प्रतापसिंह 

ह्रदयाचा ठोका 
चुकेल शत्रूचा
असा त्यांचा 
अचूक निशाना 

हिदुस्थानची 
आण, बान, शान
आमुचा प्राणप्रिय 
महाराणा प्रतापसिंह 

 प्रत्येक स्त्रींच्या डोळ्यात 
आई-बहीण शोधणारा 
हिदुस्थानचा वीरपुरूष 
महाराणा प्रतापसिंह माझा

स्वारी त्याची असे
वादळापेक्षाही तुफान
वाहन महाराणांचे
नाव त्याचे चेतक महान

अकबरही थरथरा कापे
नाव ऐकता ज्या राजाचे 
नाव त्याचे हिंदुस्थानात गाजे
त्याचे नाव असे महाराणा 

महाराणांचा आदर्श 
छत्रपतींनी ही घेतला
अन् पावन केला 
महाराष्ट्र माझा
 
तरुणांच्या रक्तात 
महाराणाचे शौर्य 
पराक्रमी लहू वाहुदे
हेच मागणे प्रभू श्रीरामास...

Manisha Maher

सौ. मनीषा संदिप बैनाडे-महेर,
परसोडा, ता. वैजापूर