वारकऱ्यांच्या गर्दीत
दंगते मायबोली मराठी
दऱ्याखोऱ्यातूनी वाहते
आमची मायबोली मराठी
तलवारीत मावळ्यांच्या
गर्जते मायबोली मराठी
तिलक होऊनी शिवबांचा
शोभते मायबोली मराठी
पदर घेऊनी नऊवारीचा
मान राखते मायबोली मराठी
तार नक्षीदार मोरपंखीचे
जोडते मायबोली मराठी
ज्ञानदेवाच्या ज्ञानेश्वरीतून
बोलते मायबोली मराठी
टाळ-मृदंगांच्या तालावरती
होऊनी तुका नाचते मायबोली मराठी
पहिले द्वार शिक्षणाचे
उघडते मायबोली मराठी
अनमोल वारसा संस्कृतीचा
जपते मायबोली मराठी
अशी ही अनमोल मराठी
मिळूनी सर्वजण जपूया
ओळख आपल्या मायबोलीची
जगास साऱ्या देऊया
मराठी राजभाषा दिनाच्या
आपणास मनःपूर्वक शुभेच्छा
पुनम सुलाने, महाराष्ट्र