नवरात्र सुरूवात मराठी कविता Marathi Kavita, Poem

प्रिती सुरज भालेराव लिखित मराठी कविता नवरात्र सुरूवात

नवरात्र सुरूवात  मराठी कविता Marathi Kavita, Poem

आज आहे घटस्थापना
नवरात्रीची सुरुवात
देवीची पूजा करूया
लावूनी अखंड वात

नऊ दिवस देवीची
करूया आराधना
पूर्ण करेल देवी
आपली मनोकामना

दुर्गा सप्तशती पाठ
घरोघरी वाचूया
होता पाठ समाप्ती
आरतीही करूया

नऊ धान्य एकत्र
घटस्थापना करू
दिव्य पुष्पमाला
नैवद्य अर्पण करू

नवरात्रीची सुरुवात
आज अशी झाली
घरोघरी दुर्गेची
प्रतिष्ठापना केली

आश्विन शुद्ध प्रतिपदा
दिवस आहे खास
चहू बाजूला पसरला
दिव्य सुगंधी वास

preeti bhalerao

सौ. प्रिती भालेराव, पुणे