अगदी तुमच्यासारखीच... मराठी कविता Marathi Prem Kavita, Poem

आदरयुक्त मैत्री कशी असावी याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच अगदी तुमच्यासारखीच...

अगदी तुमच्यासारखीच... मराठी कविता  Marathi Prem Kavita, Poem

अगदी तुमच्यासारखीच...
सुंदर, सोज्वळ अन् प्रेमळ मैत्रीण
माझ्याही आयुष्यात असावी 
अगदी तुमच्यासारखीच...

मान, सन्मान, आदर तुमचा
कायमच माझ्या मनात आहे
वास्तव्य कुठेही असो तुमचे
नाव मनात मात्र तुमचेच आहे

तुमच्याकडून घेण्यासारखे
खुप काही गुण चांगले आहे
मनात माझ्या तुमच्याविषयी
पवित्र व प्रेमळ भाव आहे

तुमची साहित्यिक वाटचाल
अन् सकारात्मक दृष्टिकोन
या कारणांमुळेच की काय 
आकर्षण माझे वाढत गेले

प्रेमळ मैत्रीच्या छत्रछायेखाली
थोडीशी सावली मला ही मिळो
अगदी तुमच्यासारखीच...
प्रेमळ मैत्रीण मला ही मिळो

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर 
९६६५६३६३०३.