रक्ताच्या नात्याला लाजवेल
असा छाया देणारा वृक्ष आहेस तू
मोरपिसांच्या स्पर्शापरी...
मनस्पर्शीनारा आहेस तू
असत्याला भेदून सत्याची
प्रखरता चमकणारा आहेस तू
पाषाणात ही वात्सलेचा
पाझर फोडविणारा आहेस तू
अन्यायाच्या पायात नुपूर बांधून
न्यायाचे सुर निनादनारा आहेस तू
भ्रष्टाचार करणाऱ्या राक्षसाला
लेखणीने ठार करणारा राम आहेस तू
विखुरलेल्या मनाला;
जोडणारा बांध आहेस तू
समाजीतील अनेक द्रौपदींचा
कर्तबगार बंधू कृष्ण आहेस तू...
आयुष्याला कंटाळणाऱ्या
हिरमुसलेल्या मनांची उभारी आहेस तू
शितल वाऱ्याच्या झोताची
चैतन्य देणारी झुळूक आहेस तू...
सौ. सरिता उध्दव भांड, पैठण
सत्याची कास धरणारा आणि असत्याचा बुरखा फाडणारा लेखक म्हणून बाबा चन्ने यांना मराठवाड्यात ओळखले जाते. बाबा फक्त सत्य लिहिणारे लेखक नसून सत्याचा त्यांच्या व्यक्तीमत्वावर खुप मोठा पगडा आहे. भांड कुटूंब आणि बाबा यांचे खुप जुने ॠणानूबंध आहे. साकेत प्रकाशन प्रा. लि. औरंगाबाद. या संस्थेचे संचालक, जेष्ठ लेखक, कादंबरीकार तथा माझे काका बाबा भांड व जेष्ठ बंधू बाबा चन्ने यांचे संबंध २००५ पासून आहे. बाबा चन्ने यांनी २००५ ते २०१५ पर्यंत साकेत प्रकाशन या संस्थेत नोकरी केलेली आहे.
भाऊ कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बाबा चन्ने, माणूसकी काय असते हे जर बघायचे असेल तर त्यांनी बाबा चन्ने यांना बघावं. साधा असलेला आकाशाएवढा माणूस म्हणजे बाबा चन्ने. मी बाबा चन्ने यांना दादा म्हणत असते. दादांबद्दल कितीही लिहिले तरी कमीच आहे. म्हणूनच मराठी चित्रपट अभिनेत्री तथा आकाशवाणी धुळे केंद्राच्या निवेदिका आदरणीय पूनमजी बेडसे मॅडम म्हणत असतील शब्दात न मावणारा बाबा म्हणजे बाबा चन्ने. मी माझ्या अनुभवाप्रमाणे दादांना काव्यांतून मांडण्याचा प्रयत्न करते...