मराठवाडा मुक्ती संग्राम

श्री. शिवसिंग भाऊलाल डोंगरजाल लिखित मराठी कविता मराठवाडा मुक्ती संग्राम

मराठवाडा मुक्ती संग्राम

या मातीच्या नव तरूणांनो, 
वाचा हा इतिहास. 
ध्येय, निष्टेला धर्म नसतो, 
आणि त्यागाला नाही जात. 

हिन्दू , मुस्लीम, शिख, ईसाई
प्राणपणाने लढले, 
स्वर्ण अक्षरांनी लिहावे असे हे, 
इतिहास घडले. 

महाराष्ट्र्रा मध्ये सामील व्हावे, 
एकच ही अभिलाषा. 
ना सत्तेची लालूच होती, 
ना खुर्चीची भाषा. 

आता आणि तेंव्हा, 
यातला फरकच मोठा आहे. 
सत्तेसाठी सारे भांडती, 
कोण कुणाचा आहे? 

मधूर फळ मिळो सारयांना, 
वृक्ष त्यांनी लाविले. 
रक्षण करण्या या बागेचे, 
शेत माळ्याला दिले. 

माळ्यानेच बगिचा लुटला, 
कशी ही उलटी निती. 
दीनदुबळ्यांना कोणी पुसेना, 
झाली फट फजिती. 

व्यर्थ न हो बलीदान तयांचे, 
दिवस असा हा येईल. 
बेईमांनाना काळच आता, 
आपल्या कुशीत घेईल. 

सांगे शिव या बेईमानावर, 
अंकुश कोणाचा आहे? 
दिवसा मागून दिवस चालले, 
त्यांचीच चलती आहे. 

जय हिन्द जय महाराष्ट्र

श्री. शिवसिंग भाऊलाल डोंगरजाल