संसारासाठी मायेच्या
जीवाचा आटापिटा
अनवाणी पायामध्ये
जीवनाच्या वाटा
हसू गोड चेहऱ्यावर
लेकरांच्या सहवासा
पिशवी मध्ये भरला
मेवा चटणी, भाकरीचा
आग पोटाची विझाव्या
माथी लाकडाचा ओझा
घास प्रेमाने घालते
मायेच्या पाखरा
बंधू प्रेम जपाव्या
हात एकमेकाच्या हाता
वाट चालते भरा भरा
माय- लेकाच्या पावला
राम- लक्षमनची जोडी
हृदय मायेचे फुलते
अनवाणी पायाला
काटे फुलेच वाटते
सौ. मनीषा महेर, परसोडा, ता. वैजापूर