माझी माऊली साऊ गं

जया विनायक घुगे-मुंडे लिखित मराठी कविता माझी माऊली साऊ गं..

माझी माऊली साऊ गं

माझी माऊली साऊ गं
मी सावित्रीची लेक,
बाप ज्योतिबा शोभतो
मंत्र दिला शिक्षणाचा नेक.

दारं शिक्षणाचे उघडले
स्वर्ग पाहीला जवळून,
होती साऊमाय माझी
गगनाला भिडले म्हणून..

लेक उमदी मीही तिची
नाही सोसणार अन्याय,
किती यातना झेलल्या तरी
नाही थांबणार पाय...

तिची प्रतिमा माझ्या मनी
देई प्रेरणा जगण्यास,
खाच खळगे पावलोपावली
नाही रोखणार प्रगतीस...

आज बालिका दिवस
भास साऊचा गं होतो,
तिच्या लेकींत क्षणोक्षणी 
स्पर्श मायेचा जाणवतो..
*********

Jaya Mude Ghuge

जया विनायक घुगे-मुंडे
जिल्हा परिषद शिक्षिका गावंदरा
परळी वैजनाथ, बीड