फळ भाज्यांची सभा मराठी कविता - Marathi Kavita, Poem

श्री. सुभाष शांताराम जैन लिखित मराठी कविता फळ भाज्यांची सभा

फळ भाज्यांची सभा मराठी कविता - Marathi Kavita, Poem

मार्केट होते फळ भाज्यांचे
सामराज्य होते तेथे गोंगाटाचे
विक्रेत्यांनी दुपारी घेतले जेवन
काही वेळातच गेले ते झोपून

 फळभाज्या नी  ठरवले घ्यावी सभा
आंबा राजा होता मधोमध उभा
प्रस्तावना केली बटाटे महाराजांनी
म्हणाले खाती सारे वेफर आनंदानी

मग उठले लाल  गाजर  डुलवा
खवा घालून सारे खाती गाजर हलवा
आंब्याचा तोरा लय भारी
सारे खाती आमरस पुरी

काकडी टोमॅटोची दोस्ती न्यारी
काकडी टोमॅटोची कोशिंबीर मस्तभारी
भाजी वांगी बटाट्याची रंगत न्यारी
लग्नाच्या पंगतीत मारती भरारी

बाजारात गर्दी ची वेळ झाली
आभार प्रदर्शनाने सभा संपली

subhash-jain

श्री. सुभाष शांताराम जैन. ठाणे.
कवी, पत्रकार, लेखक छायाचित्रकार
'कस्तुरीराम,' साईनाथ सोसायटी,
वर्तक नगर, ठाणे ६.
subhashsjain@yahoo.com 
मोबाईल नंबर . 9821821885
Whatsapp 8779348256