आकाशी मेघ आले दाटुनी
पाऊसरूपी आले मोती
हर्ष झाले धरतीच्या मनी
एक झाले आभाळ धरती
सुगंधीत झाली माती
वाहू लागले नदी झरणे
किती करावी तीची ख्याती
चौहीकडे हिरवळीत कुरणे
नवरीसारखी धरतीमाता
जिकडे-तिकडे हिरवे रान
हर्ष उल्लास चारी दिशा
फुलले वेल, फुलले पान...
सौ. कावेरी दिलीप पगार,
गोळवाडी, ता. वैजापूर