भ्रमणध्वनी Marathi Kavita

सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता भ्रमणध्वनी

भ्रमणध्वनी Marathi Kavita

भ्रमणध्वनीचा लागला शोध
जग हाती आल्याचा झाला बोध

भ्रमणध्वनीची गोष्ट निराळी
फोन भोवतीच होती गोळा सगळी

लहान थोरला लागला त्याचा लळा
तो नाही मिळाला तर काढतात गळा

लहान मुलांना हाती भ्रमणध्वनी हवा
तेव्हा तर कोठे तोंडी घास घेतोय रे भावा

मोठ्यांना लागला कीर्तनाचा नाद
भ्रमणध्वनी मुळे घालतात ते साद

मुले झाली भ्रमणध्वनी मुळे खुळे
त्यांची बोटे स्क्रीन टच करण्यासाठी वळवळे

ज्ञानगंगा आली प्रत्येकाच्या करोकरी
भ्रमणध्वनी मुळे लोक विसरली सर्व जबाबदारी


सकारात्मक घ्यायचे की
नकारात्मक घ्यायचे हे
ज्याचे त्याने ठरवावे
भ्रमणध्वनीमुळे... 
निरोप देणे-घेणे झाले सुलभ
नाहीतर वर्षानो वर्षे गाठ भेट दुर्लभ

प्रेमी जणांचा तर तो खास आहे दुवा
म्हणून तर त्यांच्यातील जवळीकता वाढते रे भावा

Jayshree Arjun Munde

सौ. जयश्री अर्जुन मुंडे,
जि.प. उच्च प्राथमिक शाळा, 
गावंदरा, ता. धारूर, जि. बीड