अनाथांची माय - सिंधुताई सपकाळ

विजेता चन्नेकर लिखित मराठी कविता अनाथांची माय

अनाथांची माय - सिंधुताई सपकाळ

जन्म तुझा संघर्षाचा
वेदनाच भोवताली
दुःख संसारी झेलून
दीनांसाठी छाया झाली

नाही तुजसाठी शब्द
काय वर्णावी महती
ईश्वराचं   प्रतिरूप
प्रगटली   भूवरती

दिला आधार जिवांना
फुलविले हसू ओठी
कुरवाळी सानुल्यांना
धरी मायेनेच पोटी

दया करुणा ममता 
वात्सल्याचा हा सागर
संकटांना झेलूनिया
भरी आनंद घागर

काट्यातूनी  शोधलाया
मार्ग जीवनाचा नवा
दिला‌ मायेचा‌ आधार
सान चिमुकल्या जीवा

अनाथांची झाली माय
सिंधुताई सपकाळ
उब‌ पंखांची देऊन
जोडी बालकांशी‌ नाळ

vijaya-channekar

विजेता चन्नेकर गोंदिया