माझा बाप मराठी कविता

सौ. कावेरी दिलीप पगार लिखित मराठी कविता माझा बाप

माझा बाप मराठी कविता

बापाच्या आयुष्यात
सुख दिसलेच नाही
किती कष्ट करुनही
दिस बदललेच नाही...

नवीन आस डोळ्यात
वाट पाहते सुखाची
एका मागून एक दिवस
माळ सरेना दुःखाची...

डोळ्यात एकच आस
होऊ दे कृपा मेघराजाची
पिकेल शेत-शिवार
फिटेल आस लेकराची...

त्याचे रोजचेच राबणे
दुज्या हातात कासरा
तुझ्या जगण्याला रे
नाही कोणाचा आसरा

kaveri

 सौ. कावेरी दिलीप पगार, 
मु.पो. गोळवाडी, ता. वैजापूर