गोरा तुझा मुखडा
नाकी शोभते नथ
तुझ्यासारखी तुच गं
जशी समईतील वात
हिरवं तुझं पातळ
कानी शोभते डूल
भरजरी पदर तुझा
देतो नजरेला हूल
बघताच क्षणी तुला
भास देवत्वाचा झाला
स्वप्नातही गं रात्री
तुझाच मुखडा आला
ओठी तुझ्या भासते
डाळींबाची गोडी...
तू चढविलेला साज
मला मनापासून आवडी
लांब लांब केस तुझे
जशी गवताची पाती
तुझ्याशिवाय नाही
जोडणार दुसरी नाती
तुझ्याशिवाय मनात
दुसरे काहीच येईना,
काहीही केले तरी
तुझा विचार जाईना.
बाबा चन्ने,
धोंदलगाव, ता. वैजापूर