नवरा मराठी कविता - Marathi Kavita

स्वाती नानासाहेब जाधव लिखित मराठी कविता नवरा यामध्ये आपल्या नवऱ्याच्या प्रेमाबद्दल वर्णन केले आहे.

नवरा मराठी कविता - Marathi Kavita

तुझी माझी गाठ 
साता जन्माची साथ ,
आपल्या संसाराला 
नवी सुखाची सुरुवात

येता येता आठवण तुझी 
अलगद गाली येते हसू ,
माझ्या आयुष्याचा तू सोबती 
साथ आपली साथा जन्माची

तू म्हणजे डोळ्यातले पाणी
तू म्हणजे मनातली आठवण,
तू म्हणजे खऱ्या प्रेमाची
मनापासून केलेली साठवण

कोऱ्या पानावर उमटवते
माझ्या मनातले भाव,
तू माझ्यात, की मी तुझ्यात
सारखी मी याच विचारात.

स्वाती नानासाहेब जाधव
लासूरगाव, ता. वैजापूर