वरदाती शैलपुत्री
रूप प्रथम मातेचे
धन धान्याने समृद्ध
होते जीवन सर्वांचे
रूप हा ब्रह्मचारिणी
रुप द्वितीय मातेचे
येता त्याग पवित्रता
होते जीवन सुखाचे
चंद्रघंटा वरदाती
रूप तिसरे मातेचे
लाभे जीवनी वीरता
होते विनाश पापाचे
रूप चतुर्थ कुष्मांडा
आई अंबिका देवीचे
रोग शोक मुक्ती लाभे
वर हे सिद्धीप्राप्तीचे
रूप देखने पाचवे
स्कंदमाता या देवीचे
पूर्ण करते कामना
द्वार खोलते मोक्षाचे
येते देवी कात्यायनी
रूप घेऊनी षष्टीचे
वर लाभते सर्वांना
होते रक्षण सृष्टीचे
वरदाती कालरात्री
देवी रूप सप्तमीचे
शौर्य प्राप्तीचे आशिष
करी विनाश पापाचे
होते पूजन विश्वात
रूप आठवे गौरीचे
करी विनाश दुःखाचा
फळ लाभते भक्तीचे
देवीरूप सिद्धिदात्री
रूप नववे मातेचे
सर्व सिद्धी प्राप्त होते
लाभे आशिष देवीचे
नवरात्री नवरुप
येथे घेऊन मातेचे
पूजा होता मनोभावे
वर लाभते शांतीचे
पुनम सुलाने
हैदराबाद