संघर्षमय आयुष्य असले जरी, मागे हटू नको,
काटेरी मार्ग असले जरी, ध्येय कधी सोडू नको!
काम असले जरी कठीण, अशक्य ते नसतं,
प्रयत्नांती परमेश्वर सतत आठवायचं असतं..!
जागोजागी मिळतील वैरी, नको त्यांची भ्रांत,
ध्यानात ठेव फक्त लक्ष्य, तू चाल रे निवांत..!
मन असते चंचल,नसते कधीच स्थिर,
हरलास जरी तू, तरी सोडू नको धीर..!
जन्माला आला आहेस, मग नको पाहू मागे,
उरतात आयुष्याच्या शेवटी, आठवणींचे धागे!
माणूस म्हणून जगलास, सामान्य म्हणून मरू नको,
काटेरी मार्ग असले जरी, ध्येय कधी सोडू नको!
सौ. शुभांगी गणेश जाधव, पुणे