नवी विचार, नवे स्वप्न
नव्या अपेक्षांचे घेऊन ओझे
होणार आहे सुरू नववर्ष
पुन्हा नव्याने तुझे अन् माझे
संकल्प करूया जिंकण्याचे
चल एकदा पुन्हा नव्याने
बहरने थांबते का कधी वृक्षाचे..?
थोडी सी पानगळ होण्याने
असेल वाट जरी जुनी
तरी उमटतील पाऊलखुणा नव्या
शोधताना दिशा नवी
आठवतील आठवणी जुन्या
थांबले न चक्र कधी काळाचे
वर्षा मागे वर्ष सरताना
का थांबावे मग क्षणासाठी
क्षण आयुष्याचे जगताना
नव्या पहाटेस नवा श्वास
रोज नव्याने भरावा
भरूनी पंखात बळ
नवा क्षितिज रोज शोधावा
नव्या वर्षाचे,नवे स्वागत
नव्या शब्दांनी करूया
विसरून सारे कालचे
नव्या दिवसात नवाने जगूया
पूनम सुलाने-सिंगल,जालना