वेदना स्त्री मनाची

सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता वेदना स्त्री मनाची

वेदना स्त्री मनाची

काय सांगू वेदना ती
असे स्त्रीच्या मनाची जी
असे कामा उभी सदा
संकटात तत्पर ही.....1

पुरुष प्रधान संस्कृतीत
असे गौण स्थान नित्य
आहे जरी कटू वाक्य
त्रिकलबाधित सत्य....2

नोकरदार स्त्री सले
पगार हवा नुसताच
धावपळ दगदग
न दिसे ती कोणालाच...3

कमावतीच म्हणती
होते मागणी पैस्याची
दुःख न पुसे कोणी ही
वागणी अशी पशुची.....4

नोकरी करूनही ती
आहे परावलंबी च
नसे पैसा हाती तिच्या
जग हसे होते नेहमीच......5

Jayshri Munde

सौ. जयश्री अर्जुन मुंडे
अंबाजोगाई