पांडुरंगा मराठी कविता - Marathi kavita

सोनूताई रसाळ यांनी लिहलेली कविता पांडुरंगा या कविता मध्ये कवियत्रीने पांडुरंगा चे वर्णन केले आहे.

पांडुरंगा मराठी कविता - Marathi kavita

अवतरशील का रे बा तू पांडुरंगा
साक्षी होण्यास माझिया अभंगा

नाम तुझे भासे स्वर्गाहूनी सुंदर
जपेल निष्फळ देऊनी आदर

कर ठेऊनी कटेवर उभा राहुनी विटेवर
पाठीराखा नेत्री पाहुनी मिटेल मनाची मरळ

ओढ जीवा लागली जसे गाय वासरू
पाजशिल ना रे पान्हा माय कनवाळू

सुकला रे प्राण घेण्या तुझा दर्शना
होतील नष्ट सगळ्या आत्मयातना

नाही घेता दर्शन जरी पंढरीसी येऊन
लटकीच भक्ती माझी होई तळमळ

होऊनी लेकुरवाळा सांभाळशी रे दीनदयाळा
पांगुळले जरी चरण माझे मन पाहे सर्व सोहळा


सोनूताई रसाळ,
कापूसवाडगाव, ता. वैजापूर.