नव्या आयुष्याची नवी सुरुवात
त्याशिवाय जमेना कोणतीच बात
आयुष्य आहे माझे खूप सुंदर
नकारात्मक माणसांमुळे झाले बंदर
कोणालाच कळेना मनातील अंतर
मने जुळायला नसते कोणते मंतर
असाव्या लागतात त्याही रेषा हातात
नसते सर्वकाही सर्वांच्या नशिबात
आहे त्यात सुख मानता यायला हवं
नात मनामनाचे निरंतर जपायला हवं
नसतात काही माणसे बोलण्याच्याच लायकीची
बोलण्यासाठी हवी ओढच तीव्र अंतर्मनाची
असतात काही माणस फक्त दिखव्यासाठी
काही देणं घेणं नसतं इतरांच्या भावनासाठी
असावे हितगुज मनाचे मनाशी बंधमुक्त
असावा संवाद नेहमी प्रेम व आदरयुक्त
नसते कोणतेच नाते खरे व प्रामाणिक
इथे झाले सर्वांचे वर्तन च अप्रामाणिक
हरवले आहे नात्यातील प्रेम एकनिष्ठता
त्यामुळे वाढत आहे मनाची विषण्णता
लळा जिव्हाळा शब्द ठरले खूपच खोटे
प्रेममय आयुष्यात भेटतात धोखे होतात तोटे
भावनांचा पसारा आवरावा कसा
जर मिळालाच नाही जोडीदार हवा तसा
होते जीवनाची ससेहोलफट चरफड
मनुष्य अंतर मनात करीत राहतो निष्फळ बडबड
अनेक जणांना नसते डोळस नजर
रत्नाला परखण्याची
त्यासाठी ही हवी असते दृष्टी
समोरच्याचे गुण ओळखण्याची
सभोवती दाटला अंधकार निराशेचा जरी
आत्मविश्वासाने मी सदैव घेते झेप अंबरी
आयुष्यभर मिळाल्या मज वेदना
त्याचमुळे हरवल्या माझ्या संवेदना
आहे परमानंद मला एकांतात
होते जाणीव मला स्वत्वाची आत्मपरीक्षणात
हरवली वाट माझी हरवल्या दाही दिशा
चढली इथे संपत्तीची चैन विलासाची नशा
जन्मतो माणूस की हो एकटा
मरतो माणूस की हो एकटा
इथे नसते कोणीच कोणाचे
जंगल नुसते अमानवी पशूंचे
इथे भरतो बाजार दिखाऊ नात्यांचा
नसतो इथे हृदय संगम हो कशाचा
इथे चढला कैफ पुरुषप्रधान संस्कृतीचा
होतो ह्रास समस्त नारी जातीचा
दाटले नैराश्य जरी अंतरी
लढण्याची शक्ती भेटेल आहे खातरी
आहे मन माझे पवित्र , निरझर ,निर्मळ
तमा मला ना कशाची
मिळे जगण्याचे बळ
होतात तीव्र आघात माझ्या हृदय मंदिरी
तरी जगते उगाच हसते सदैव अंतरी
झाले अबोल शांत कायमचीच मी
कोंडल्या दाटल्या भावना त्या नेहमी
प्रेम पात्र मनुष्याला मिळे तिरस्कार या भूवरी
तिरस्कार पात्र व्यक्तीस मिळे प्रेम धरतीवरी
देव झाला कसा आंधळा हो अंबरी
दाटला अन्याय सदैव या भूमीवरी
कोपता मनातून सत्य निरागस आत्मा
नसे सत्याला कशाचीच मग तमा
असतात काही माणसे दळभद्री दलिंदर
दिले देवाने सोने जरी राहते गरीब निरंतर
असते मन तयांचे नीच व भंगार
हिऱ्याला समजती सदैव काचेचा अंगार
होईल जेव्हा वर्षाव प्रेमरूपी पावसाचा
फुटेल तेव्हा बांध मग नयनांचा
झेलले सदैव राग ,दुःख सदैव जगी
फुलेल हास्य प्रेममय सदैव मनी
वादळे मनातील असतात रौद्ररूप धारक
नसते अशा परिस्थितीत कोणी तारक
एकटा असला जरी देह नश्वर भूवरी
आहे ईश्वर भक्ती शक्ती वसे अंतरी
आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ओठावरी
आहे घुसमट कोंडलेल्या भावनांची उरी
घाव हा मनाचा कधीही न भरणारा
व्रण या घावाचा ना कशाने जाणारा
नाही किंमत भावनिक लोकांना जगती
कळेल लवकर जगाला भावनांची महती
नागव्यांच नाच हसून पही जनता
कौतुक जगाला नाग व्याना भारी म्हणता
भावनांशी कोणाच्या कोणीच खेळू नये
आनंदाने जगणे उगाचच मारू नये
आपला माणूस कोणासही म्हणू नये
नसते लायकी आपले होण्याची
गाठतात पायरी नालायक पणाची
वागण्याने होते जाणीव परकेपणाची
भाषा न कळ ते आपलेपणाची
परिभाषा असते निराळी प्रेमाची
होते होळी पवित्र भावनांची
होते ओली कडा लोचनांची
सौ. जयश्री अर्जुन मुंडे
अंबाजोगाई