पोळा मराठी कविता

सौ. प्रिती सुरज भालेराव लिखित पोळा मराठी कविता मध्ये नंदीबैलाच्या पूजणाचे आणि शेतकऱ्यांसाठी साठी त्याचे महत्व वरणिले आहे

पोळा मराठी कविता

नंदबैलाच्या पूजनाचा
बैलपोळा सण आला
आनंद गगनी मावेना
शेतकरी हर्षित झाला

पोळ्याच्या दिवशी बघा
बैलांना कसे सजवतात
शोभे नवीन कोरी झुल 
घुंगर माळाही घालतात

वर्षभर शेतात राबणारा
बैल शेतकऱ्याचा राजा
पोळ्याच्या दिवशी झाला
शोभे नवरदेव बैल माजा

मोठी मोठी शिंगे तुझी
ऐटीत कसा तू डोलतो
बैलपोळ्याच्या दिवशी
पुरणपोळी कशी खातो

सदैव करतोस तू रे
आम्हा सर्वांसाठी कष्ट
इतका छान दिसतोस
ना लागो कुणाची दृष्ट

बैलांची मिरवणूक कशी
वाजत गाजतच निघाली
नैवैद्य दाखविला पुरणपोळी
बैलजोडी कशी तुष्ट झाली

सौ. प्रिती सुरज भालेराव