राजे तुम्ही पुन्हा या

स्मिता पाटील राऊत लिखित मराठी कविता राजे तुम्ही पुन्हा या...

राजे तुम्ही पुन्हा या

राजे तुम्ही पुन्हा कधीच येऊ शकत नाही,
जे तुम्ही पेरले ते कधी उगलेच नाही,
जनतेसाठी तुम्ही स्वराज्य स्थापन केले,
आता तर रक्ताचे नाते आटुन च गेले,

कसे घडविले होते स्वराजसाठी  लढणारे
एकनिष्ठ असे ते मावळे...आता तर
देशाला ,नात्याला विसरून 
फेसबुक, व मोबाईल साठी तरुण झाले बावळे,

म्हणून असे वाटते मनाला राजे.
तुम्ही पुन्हा कधीच येऊ शकत नाही,
जे तुम्ही पेरले ते कधीच उगवलेच नाही,
पर स्त्री मातेसमान ही शिकवण दिली,
पण आता तर त्या भावनेने 
स्त्री कडे पाहण्याची नजरच मरून गेली,

जाती-धर्म श्रेष्ठ कनिष्ठ भेद केला नाही,
हे धरूनच चालते आताची जनता
राष्ट्रप्रेम व माणुसकी च उरली नाही
जीवाला जीव देणारी माणसे तेव्हा होती,

दुसऱ्या चा जीव घेवुन स्वतः च कसे 
जगता येईल ही प्रथा आता सुरू झाली,
ऐवढेच कायपण एकमेकांना मागे खेचून,
मीच पुढे कसा जाईल ,हीच शाळा सुरु झाली,

म्हणून असे वाटते मनाला राजे
तुम्ही पुन्हा कधीच येऊ शकत नाही,
जे तुम्ही पेरले ते कधीच उगवलेच नाही,

पण राजे वाटते असे नेहमी मनाला,
तुमची आज खुप गरज आहे
पुन्हा हे सगळे पालटण्यासाठी 
तुम्ही एकदा तरी पुन्हा यावे...पुन्हा यावे..

smita raut

स्मिता पाटील राऊत