रक्षाबंधन..

सौ. अमिता अरविंदराव घाटोळ लिखित मराठी कविता रक्षाबंधन...

रक्षाबंधन..

भाऊ बहीण नात्याचा
श्रावण सण रक्षाबंधन ।
राखीचा बांधूनिया धागा
भाऊ करी आयुष्यभर रक्षण ॥१॥

उपमा नसे जगी तयाला 
भावनांचे प्रेमळ बंधन
सीमेवर पाठवून राखी
सैनिक करती संरक्षण ॥२॥

राखी हातात कपाळी टिळा 
आला नारळी पौर्णिमा सण ।
गोड विश्वास जिव्हाळा 
भाऊराया ओवाळीते बहीण॥३॥

कृष्ण द्रोपदी हुमायू कर्णवती 
इतिहासात कित्येक उदाहरण ।
अखंड प्रेमळ निर्मळ सोबती  
ऋणानुबंधाचे नाते मनोमन ॥४॥

Amita Ghatoe

सौ. अमिता अरविंदराव घाटोळ,
अकोला