रणरागिणी मराठी कविता - Marathi Kavita

सौ. प्रिती सुरज भालेराव लिखित घरातील गृहलक्ष्मी चे वर्णन करणारी कविता रणरागिणी...

रणरागिणी मराठी कविता - Marathi Kavita

घरातील गृहलक्ष्मी
वैभव असते घराचे
तिच्यामुळे आनंदी
दिवस असे सुखाचे

सर्वकाही येते तिला
आहे संपूर्ण ज्ञान
पाहुणा येताच द्वारी
करते ती अन्नदान

आल्या गेल्या माणसांची
मनोभावे सेवा करते
सर्वांच्या सुखासाठी
अहोरात्र ती झटते

ना कशाचा गर्व तिला
ना असे स्वाभिमान
कष्ट करते दिवसरात्र
राखते सर्वांचा मान

मुलांचे अध्ययन घेते
कधी असते वेदिका
येता राग तिला बहू
रूप धरते चंडिका

संसाराचा हा गाडा
पुढे हाकत राहते
सर्वांच्या सुखातच
तिचे सुख ती पाहते

सौ. प्रिती सुरज भालेराव