द्वेष वैर मिटवूनी
रंग उधळू प्रेमाचे
जपू स्नेह प्रेमभाव
धागे गुंफु विश्वासाचे
फार महत्त्व जीवनी
नानाविध या रंगांना
मिसळता मने सारी
मिळे उभारी स्वप्नांना
जाळू अहंकार खोटा
देऊ आज आलिंगन
हर्ष उल्हासानी धुंद
दिसे प्रत्येकांच मन
सण होळीचा येता हा
खेळू आनंदाने रंग
नभी उधळू गुलाल
होऊ प्रेमरंगी दंग
सौ.विजेता चन्नेकर गोंदिया