रंगात रंगूनिया...

सौ. कावेरी निकम-पगार लिखित मराठी कविता रंगात रंगूनिया...

रंगात रंगूनिया...

बघता बघता रंग तुझा 
सावळा माझा नेक झाला
रंगात रंगूनिया सावळ्या
परमेश्वर माझा एक झाला

आयोध्यापती राम माझा
रंग सावळा घेऊन आला
प्रत्येकाला इहलोकी 
सुसंस्कार देऊन गेला...

रंग दातृत्वाचा तो सावळा 
मनी माझ्या घट्ट झाला
सावळ्या सावळ्या ढगातूनच 
अमृताचा पाऊस बरसला...

काळ्यासावळ्या मातीतूनच 
सोन्यासारखे मोती निर्मिले
रामरूपी सावळा पाहता 
मन माझे तृप्त झाले...

Kaveri Pagar

सौ. कावेरी निकम-पगार,
मु. गोळवाडी, पो. दहेगाव, 
ता. वैजापूर, जि. संभाजीनगर