आरशात रोज,रोज
पहाते मी स्वतःला,
नयनाच्या भाषेनी
जाब विचारी प्रतिबिंबाला...
मनीच्या जगी एक
प्रतिमा साकारली,
इतरांची हुशारी
सदैव नाकारली...
आपलेच प्रतिबिंब
बोलते जेव्हा,
काळजाचा ठाव
हळू घेई तेव्हा...
मनाचे सौंदर्य
प्रतिबिंबास खुलविते,
आरशाच्या काचेतूनी
मोहीनी घालिते...
स्वतःच्याच नजरेत
निखळ असावे,
जिवनाचे प्रतिबिंब
उमदे भासावे...
सौ. जयाबाई विनायक घुगे-मुंडे,
परळी वैजनाथ, जि. बीड.