नाते गुरुशिष्याचे

गुरू शिष्याचे नाते उलगडून दाखवणारी श्रीमती. पल्लवी चव्हाण यांची नाते गुरूशिष्याची कविता.

नाते गुरुशिष्याचे

असता गुरुवर्य पाठीराखा,
मार्ग दाखवी नेक,
धरे शिरी कृपेची छाया,
तारावया संकटे अनेक ॥ १ ॥

पथ चुकता मार्ग दाखवि,
ध्येयापर्यत सत्वर पोहचवी,
इसिप्त उद्दिष्ट गाठण्यासाठी,
हाती देई कष्टाचीच चावी ॥ २ ॥

दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीने,
शिष्याचे जीवन फुलवितात,
वेळप्रसंगी शिक्षा करूनी,
सन्मार्गावर नेवूनी सोडतात ॥ ३ ॥

सुजाण नागरीक घडविण्या,
गुरुच खरे मार्गदर्शक ठरतात,
दिलेल्या आपुलकी व प्रेमामुळेच,
शिष्य आनंदे जीवन उपभोगतात . ॥ ४ ॥

 शिष्याच्या यशाने मोदे हुरळतात,
निस्वार्थीपणाने उज्वलता मिरवितात,
पदोपदी पुढे जाण्यासाठी सदासर्वदा,
आशीर्वादांची पाठिशी बरसात करतात ॥ ५॥

गुरूने दिलेल्या सुसंस्कारांची,
शिष्य मनी जाणिव ठेवतात,
जीवनात यशोशिखरे गाठतात,
अन् गुरुंना हिच गुरुदक्षिणा देतात . ॥ ६ ॥

श्रीम. पल्लवी जयप्रकाश चव्हाण
(सहशिक्षिका)
ता. परंडा, जि. धाराशिव